Wednesday, 4 March 2015

Letter to Dr. Abhay Bung published in Weekly Sadhana 22 Nov 2014

डॉ. अभय बंग यांस,

तुमचा साधना युवा दिवाळी अंक २०१४ मधला लेख आवडला. तुमचं कार्य आणि तुमचे विचार याविषयी एकूणच आम्हाला आदर आहे. तुमचे लेख आम्ही आवडीने वाचत असतो. तुमचा साधनामधला लेख तरुणांना प्रेरणादायी ठरेल याविषयी शंका नाही.

मात्र वॉरन बफे, बिल गेट्स आणि अझीम प्रेमजी यांच्याविषयी तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांसंदर्भात काही वेगळं मत मांडावंसं वाटलं. ‘शेवटी या पैशात समाधान नाही’ अशी त्यांची भावना असेलच असं नाही. अमेरिकन लोकांच्या मते सर्व गोष्टी त्या त्या वयात करायच्या असतात. तरुणपणी जीवनाचा आनंद घेऊन, भरपूर पैसे मिळवून आयुष्याच्या संध्याकाळी पैसे देण्याचा विचार ते करतात. It is a sin to die rich हा विचार रॉकफेलर पासून गेट्स – बफे पर्यंत अनेक लोक करतात. याचं कारण तरुणपण हे पैसे कमावण्यासाठी आणि म्हातारपण हे दान करण्यासाठी ही त्या लोकांची ‘आश्रमपद्धती’ असते.

जे लोक तरुण वयात समाजसेवेकडे वळतात त्यांच्याविषयी आदर आहेच. पण प्रेमजी सारख्या धनिकाने तरुण वयात प्रत्यक्ष समाजसेवा करण्यापेक्षा लक्षावधी लोकांना रोजगार दिला ही एक प्रकारची समाजसेवाच आहे. देशाला प्रचंड प्रमाणात परकीय चलन मिळवून दिलं हेही महत्वाचं आहे. आपण कितीही स्वावलंबनाचा प्रयत्न केला तरी देशाचा गाडा चालवायला त्या चलनाची आवश्यकता नाकारता येत नाही. आणि तरुण वयात प्रत्यक्ष समाजसेवा न केल्यामुळे आज ते आठ अब्ज डॉलर इतकी प्रचंड रक्कम शिक्षणासाठी देऊ शकतात. म्हणजे समाजसेवा करणाऱ्या तरुणांबरोबर रोजगार निर्मिती आणि नंतर अब्जावधी डॉलर देऊ शकणारे प्रेमजीही आपल्याला हवेत.  
  
विवेक गोविलकर
मुंबई

No comments:

Post a Comment